सत्यमेव जयते
फार्मर कप 2026

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक नवी पहाट — गट शेतीच्या माध्यमातून समृद्धीचा मार्ग

सत्यमेव जयते फार्मर कप 2026

सत्यमेव जयते फार्मर कप म्हणजे काय?

फार्मर कप ही पानी फाउंडेशनने आयोजित केलेली, शेतकरी गटांमध्ये होणारी, गटशेतीची एक स्पर्धा आहे. ज्यामध्ये शेतकरी आपले पीकनिहाय गट तयार करून, स्पर्धेच्या 'स्मार्ट शेती' ऍपवर त्याची नोंदणी करून, स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

शेतकरी गट तयार करण्याची आवश्यकता काय?

शेतीत समस्या अनेक असतात. बी-बियाण्याचं संकट, खताचं संकट, कीड आणि रोगांच संकट, बदलत्या हवामानाच संकट, बाजारात होणाऱ्या चढउताराचं संकट, इत्यादी. या सर्व संकटांशी एकट्याने लढणे अशक्य आहे. परंतु जर एकच पीक घेणारे शेतकरी गटाच्या रूपाने एकत्र आले, तर त्यांची एक मोठी सामूहिक ताकद तयार होते, जिच्या जोरावर शेतीतल्या सर्व संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये निर्माण होते.

हा फक्त विचार नाही तर हे सिद्ध झालेले आहे.

गटशेतीतून निर्माण होणाऱ्या सामूहिक ताकदीचा प्रत्यक्ष अनुभव महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी स्वतः घेतला आहे. साल २०२२ ते २०२४ या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या ४६ तालुक्यात, 'सत्यमेव जयते फार्मर कप'च्या माध्यमातून ४,००० पेक्षाही जास्त शेतकरी गट तयार झाले. गटाच्या रूपात शेतकरी एकत्र आल्याने त्यांची शेती पार बदलून गेली. अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन हे दुपटीपेक्षाही जास्त झाले, खर्च निम्म्यापेक्षाही कमी झाला, आणि नफा प्रचंड वाढला.

गट शेतीचा परिणाम (2022-24)

४,०००+

शेतकरी गट

४६

तालुके

२×

उत्पादनात वाढ

५०%

खर्चात बचत

एवढा अमूलाग्र बदल कशामुळे?

🛒

सामूहिक खरेदी — खर्चात बचत

बी-बियाणे, खते एकत्र खरेदी केल्याने मोठा डिस्काउंट मिळाला. इर्जीक पद्धतीने काम केल्याने मजुरीचाही खर्च वाचला.

🌿

नैसर्गिक कीड नियंत्रण

दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जैविक कीटकनाशके — नैसर्गिक उपायांमुळे खर्चात मोठी बचत झाली.

📱

डिजिटल शेती शाळा

कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी थेट संवाद आणि तंत्रशुद्ध SOPs मुळे उत्पादकतेत मोठी वाढ झाली.

🌦️

हवामान बदलाशी झूंज

अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ — पिकाचे नुकसान टाळण्याचे धडे शेतकऱ्यांनी गिरवले.

महिलांसाठी मोकळे आकाश

फार्मर कप आणि गटशेती म्हणजे महिलांसाठी आपले वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रगतीसाठी एक मोकळे आकाश ठरले आहे. आजवर तयार झालेल्या शेतकरी गटांपैकी निम्मे गट हे संपूर्ण महिला शेतकऱ्यांचे आहेत.

एकत्र आल्याची ताकद अनुभवल्यानंतर अनेक शेतकरी गटांनी समाजोपयोगाची अनेक कामे स्वतः हाती घेऊन पूर्णत्वास नेली आहे. जसं गावात पाणलोट विकासाचे काम करणे, पानंद रस्ता तयार करणे, गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि मानसिक आधार देणे. आपसातले सर्व मतभेद दूर सारून अनेक गावांमध्ये शेतकरी एकत्र येत आहेत आणि गावाचा कायापालट करत आहेत.

महिला शेतकरी - पानी फाउंडेशन

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात

यंदा साल २०२६ मध्ये, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, उमेद अभियान, तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या सर्व यंत्रणांचा भक्कम पाठिंबा यंदा या स्पर्धेला लाभला आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग
महाराष्ट्र शासन कृषी विभाग
उमेद अभियान
उमेद अभियान
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

तुम्हीही या प्रवासात
नक्की सहभागी व्हा!

एकच शेती, गट शेती !